'अल्लाह हू अकबर' चा नेमका अर्थ काय?

29 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला

याबाबत नवीन व्हिडिओ व्हायरल. ज्यामध्ये झिपलायनिंग करणाऱ्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात दहशतवादी घटना रेकॉर्ड झाली

व्हिडिओमध्ये झिपलाइन ऑपरेटर देखील दिसतोय. पर्यटकाचा दावा आहे की गोळीबार सुरू होताच ऑपरेटरने "अल्लाह हू अकबर" म्हटलं

'अल्लाह हू अकबर' हा अरबी शब्द आहे. मुस्लिम लोक बहुतेकदा अजानमध्ये याचा उल्लेख करतात.

इस्लामिक विद्वानांच्या मते, 'अल्लाह हू अकबर' म्हणजे 'अल्लाह महान आहे'

मुस्लिम लोक आनंद, दुःख, संकट अशा अनेक प्रसंगी त्यांच्या प्रार्थनेत 'अल्लाह हू अकबर' म्हणतात

जेव्हा त्यांच्यात मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या कानात सर्वात आधी 'अल्लाह हू अकबर' म्हटलं जातं