वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज राधा राणीचे भक्त आहेत. त्यांचे अनेक विषयावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

15 June 2025

प्रेमानंद महाराज म्हणतात, शुद्ध ह्रदयाने दान करणे हे पुण्य कर्म मानले जाते. चांगल्या कार्यातून आपण आत्मासाठी पुण्य गोळा करतो.

दानामुळे नकारात्मक कार्याचा प्रभाव कमी होतो किंवा नष्ट होतो, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले.

ज्या आत्मांनी निस्वार्थ भावाने दान केले आहे किंवा धर्मपूर्वक जीवन जगले आहे, त्या मृत्यूनंतर स्वर्गात जातात. 

स्वर्गात चांगल्या कर्माचे फळ त्या आत्मांना मिळते. सुख, शांती त्यांना मिळते. 

दान करणाऱ्या आत्मा चांगल्या परिवारात, चांगले आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक विकासासोबत जन्म घेतात.

निस्वार्थ दान मन आणि ह्रदय शुद्ध करण्यासाठी मदत करतो. अहंकार, मोह आणि स्वार्थ कमी करते.

दान करणाऱ्या आत्मांना लवकर मोक्ष मिळतो. त्यांना यमलोकात येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत नाही.