भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे.

27 June 2025

भगवद्गीता वाचल्यावर चांगले आणि वाईट याचे ज्ञान होते. ज्या घरात नियमित भगवद्गीतेचे पाठ होतात त्या घरात नेहमी आनंद, सुख असते.

जे व्यक्ती नियमित भगवद्गीतेचे श्लोक पठण करतात, ते कठीण परिस्थितीलाही सहज सामोरे जातात. 

भगवद्गीता अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. त्याला नेहमी पूजाच्या स्थानी ठेवा. स्नान केल्याशिवाय स्पर्श करु नका. 

भगवद्गीतेचा कोणताही अध्याय सुरु केल्यावर तो पूर्ण झाल्याशिवाय आसन सोडू नका. अध्याय पूर्ण झाल्यावरच उठा.

गीताचा पाठ सुरु करण्यापूर्वी भगवान गणेश आणि श्रीकृष्ण यांचे स्मरण करा. ज्या आसनावर रोज पाठ करतात, तेच आसन वापरा. ते आसन इतरांना वापरु देऊ नका.

श्रीमद्भगवद्गीता जमिनीवर खाली ठेऊ नका. त्यासाठी लाकडी स्टँडचा वापर करा. भगवद्गीताचे नियमित पाठ केल्याने मोक्ष मिळत असल्याचे सांगितले जाते.