भगवान शिव यांना प्रसन्न करणे सर्वात सोपे आहे. महादेव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात.

28 June 2025

भगवान शिव यांना यामुळेच भोलेनाथ म्हणतात. भोलेनाथच्या भक्तीसाठी शिवलिंगावर जल अर्पण केले जाते.

शिवलिंगावर जल अर्पण केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.

शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी काही नियम आहेत. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजेच.

शिवलिंगावर नेहमी बसूनच जल अर्पण करावे. उभे राहून शिवलिंगावर जल अर्पण करु नये. 

शिवलिंगावर उभे राहून जल अर्पण केल्यास पूजा केल्याचे फळ मिळत नाही. यामुळे घाई न करता शांततेत पूजा करावी.

शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात जल अर्पण करा. चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ असते. 

स्टीलच्या ताब्यातून जलाभिषेक करू नका. कारण शनि-राहूचा स्टील किंवा लोखंडावर प्रभाव असतो.