पंचमुखी बेलपत्राचे महत्त्व काय असते?

 10 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पंचमुखी बेलपत्र म्हणजे पाच पाने असलेल्या बेलपत्राला पंचमुखी बेलपत्र म्हणतात.

बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते

पाच पानांचे बेलपत्र हे भगवान शिवाच्या पाच तत्वांचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश.

दोन्ही प्रकारचे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करता येते.

धार्मिक मान्यतेनुसार, तीन पानांचे बेलपत्र त्रिमूर्ती - ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करते.

श्रावणात शिवलिंगाला पंचमुखी बेलपत्र अर्पण करण्यात काही गैर नाही.

पंचमुखी बेलपत्र हे एक दुर्मिळ आणि शुभ बेलपत्र आहे जे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण केले जाऊ शकते.