अनेक वेळा आपल्याकडून अनावधानाने चूका होतात. त्यामुळे लोक व्रत, उपवास करतात. 

31 May 2025

भगवंत दयाळू आहे. व्रत, दान, तीर्थयात्रा किंवा पश्चाताप पाहून भगवंत माफ करुन देतात. 

एक पाप असे आहे, जे भगवंत माफ करत नाही. ते पाप आहे तरी कोणते?

राधा राणीचे भक्त प्रेमानंद महाराज म्हणतात, भगवान सर्व पाप माफ करतात. परंतु त्यांच्या भक्तांचा अपमान माफ करत नाही. 

लोक संतांचा अवमान करतात. त्यांच्यासंदर्भात चुकीची वक्तव्य करतात. त्यांना भगवंत माफ करत नाही, असे प्रेमानंद महाराज यांनी म्हटले.

भगवंतांच्या भक्तांवर टीका केल्यामुळे देवाच्या प्रेम आणि भक्तीला दुखावण्यासारखे आहे.

प्रेमानंद महाराज म्हणाले, भक्ताचा अपमान करणे हे सर्वात मोठे पाप आहे. भक्ताने क्षमा केली तरच मोक्ष शक्य आहे. परंतु त्यांना देव कधीही क्षमा करत नाही.