पती आणि पत्नी यांच्यातील नाते विश्वासाचे असते. दोघांचे संबंध अतूट असतात.

8 June 2025

पतीने पत्नीचा विश्वास तोडला तर काय करायला हवे? यावर प्रेमानंद महाराज यांनी काही उपाय सांगितले आहे.

विश्वास तुटल्यावर पत्नीला संताप येईल. दु:ख होईल. निराशा वाटणेही स्वाभाविक आहे. या भावना दाबण्याऐवजी त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजे. 

प्रेमानंद महाराज म्हणतात, पतीने विश्वास तोडला तर त्याच्यासोबत शांततेत स्पष्टपणे संवाद साधला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला आणि तुमचा किती विश्वास तुटला हे त्याला सांगा.

पतीने विश्वास तोडला असेल, तर भविष्यात असे वर्तन टाळण्यासाठी स्पष्ट सीमा आणि परिणाम निश्चित करा. विश्वास एका रात्रीत पुन्हा तयार होत नाही.

पत्नीचा विश्वास मिळवणे एक हळूवार प्रक्रिया आहे. ज्यासाठी वेळ लागतो. संयम लागतो. तसेच ज्या व्यक्तीने विश्नास तोडला त्याच्याकडून विश्वास संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न लागतात.

तुम्ही दोघे ही समस्या सोडवू शकत नाही तर एखाद्या अध्यात्मिक गुरुचा सल्ला घ्या. त्यामुळे मानसिक शांती आणि योग्य दिशा मिळेल. 

आपला स्वाभिमान आणि कल्याण यांना प्राधान्य देणे महत्वाचे आहे. ज्या नात्यात विश्वास वारंवार तुटतो अशा नात्यात राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.