तुळशीची माळ तुटली तर काय करावे?

23 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

तुळशीची माळ अतिशय पवित्र मानली जाते. तुळशीची माळ धारण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.

बऱ्याचदा गळ्यात घातलेली तुळशीची माळ तुटते. अशा परिस्थितीत काय करावं?

ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीची माळ तुटल्यावर अशुभ मानली जात नाही.

तुळशीची माळ तुटली तर ती दुरुस्त करू नये. तुटलेली तुळशीची माळ पुन्हा जोडू नये.

तुळशीची माळ तुटली तर त्याचे तुटलेले मणी गोळा करून पूजास्थळी ठेवावेत किंवा झाडाखाली पुरावेत.

तुळशीची माळ तुटली किंवा खराब झाली असेल तर तुम्ही ती बदलू शकता. पण ती इकडे तिकडे फेकू नका

तुळशीची माळ तुटली तर तुम्ही त्याचे मणी तलावात किंवा नदीच्या पाण्यात सोडू शकता

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)