अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर मोठी चूक; लक्षात येताच चाहत्यांची मागितली माफी
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर एक चूक झाली जी लक्षात येताच त्यांनी लगेच चाहत्यांची माफीही मागितली.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या 5 दशकांपासून चित्रपट करत आहेत. त्यांना प्रत्येक युगातील अभिनेता मानले जाते कारण त्यांनी प्रत्येक युगानुसार स्वतःला बदललं आहे आणि आजही ते त्याच टॉप लिस्टमध्ये आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही तेवढेच सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. चाहत्यांशी जोडणे त्यांना आवडते. नेहमी प्रमाणे काल (22 जून) रोजी रात्री अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून एक चूक झाली जी लक्षात येताच त्यांनी लगेच चाहत्यांची माफीही मागितली.
सोशल मीडियावर चूक
अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच ‘एक्स’वर चाहत्यांशी संवाद साधला. तसेच चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली. एवढंच नाही तर सध्या प्रत्येकाच्या फोनवर ऐकू येणाऱ्या त्यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनबद्दलही त्यांनी चर्चा केली. अमिताभ बच्चन त्यांचे विचार हिंदीत लिहिण्यास प्राधान्य देतात. या दरम्यान त्यांच्याकडून लिहिण्यात एक चूक झाली. पण जेव्हा त्यांच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्यांची चूक सुधारली आणि लोकांची माफीही मागितली.
काहीतरी चुकीचे लिहिले अन्….
एका चाहत्याची संवाद साधत असताना अमिताभ यांनी लिहिले ‘हो हिजूर, मीही त्याचा चाहता आहे, म्हणून!!!???’ काही तासांनंतर, जेव्हा त्यांना कळले की त्यांनी काहीतरी चुकीचे लिहिले आहे, तेव्हा त्यांनी लगेच पुढच्या पोस्टमध्ये त्यांची चूक दुरुस्त केली. अन् लिहिले ‘हुजूर, हिजूर नाही, माफ करा टायपिंग मिस्टेक.’ तसेच अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपट ‘कालिधर लापता’ चे प्रमोशन देखील केल.
T 5419 – जी हाँ हिज़ूर, मैं भी एक प्रशंसक हूँ 👇🏽👇🏽👇🏽 तो !!! ???
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 22, 2025
अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते यापूर्वी दक्षिणेकडील चित्रपट ‘वेट्टाय्यां’ मध्ये दिसले होते. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2024 च्या सुरुवातीला, ते संपूर्ण भारतातील ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच पसंत करण्यात आली होती. आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचे झाले तर, वृत्तानुसार, अमिताभ आता ‘रामायण भाग 1’ या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये ते जटायूची भूमिका साकारू शकतात.
