6 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिन्यांचा कालावधी असतो.
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णु या चार महिन्यात योगनिद्रा धारण करतात. अशा स्थितीत पृथ्वीचा कारभार कोण बघतो?
चार महिन्यांच्या कालावधीत पृथ्वीची जबाबदारी भगवान विष्णुंच्या खांद्यावरून काढली जाते.
चातुर्मासात भगवान विष्णु योगनिद्रेत असताना महादेवांकडे जबाबदारी असते.
चातुर्मासात महादेव भगवान विष्णुंच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात.
त्यामुळे चातुर्मासात भगवान शिवाची पूजा करण्याचं विधान आहे. कारण महादेव या काळात पृथ्वीचा गाडा हाकतात.