मकरसंक्रांतीला काळे कपडे घालतात कारण...
08 january 2026
Created By: Shweta Walanj
महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे.
काळ्या साडीवर रंगीत किनार, दागिने घालणे ही महाराष्ट्राची खास सांस्कृतिक ओळख बनली आहे.
मकरसंक्रांतीच्या काळात थंडी जास्त असते. काळा रंग उष्णता अधिक शोषतो, त्यामुळे शरीर उबदार राहते.
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून सकारात्मक ऊर्जा वाढवतो, अशी श्रद्धा आहे.
काळा रंग राहू-केतूशी संबंधित मानला जातो. तो घातल्याने त्यांचा दुष्परिणाम कमी होतो, असे मानले जाते.
काळा रंग वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती शोषतो, अशी लोकांची समजूत आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...