हिंदू धर्मात हळद आणि कुंकू शिवाय कुठलीही पूजा होत नाही. मात्र महादेवाच्या पुजेत हळद आणि कुंकू वापरत नाही. 

17 June 2025

शिवलिंगाला भगवान शिवचे पुरुष तत्व आणि त्यांचे विरक्त, तपस्वी स्वरूप मानले जाते. भगवान शिव वैरागी आहेत.

हळदचा संबंध मुख्यता: स्त्री सौंदर्य, सौभाग्य आणि लग्नात केला जातो. यामुळे महादेवाच्या पुजेत किंवा महादेवाला काही गोष्टी वाहणे शास्त्रात निशिद्ध सांगण्यात आल्या आहेत.

काही मान्यतांनुसार, हळदचा संबंध भगवान विष्णू यांच्याशी आहे. ते पितांबरधारी असल्याने त्यांना हळद प्रिय आहे. 

कुंक सौभाग्याचे लेणे आहे. विवाहीत स्त्रियांच्या पतीशी संबंध कुंकूचा आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाहीत महिला कुंकू वापरतात.

काही मान्यतानुसार, केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा भगवान शिव यांचे लग्न झाले होते आणि गृहस्थ बनले होते, त्या दिवशी कुंक वाहण्याची परंपरा आहे. 

शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये. महादेवाच्या पूजेत कधीच शंख वापरले जात नाही. 

शिवपुराणानुसार, शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता. त्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता. म्हणूनच शिवलिंगाला कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही.