हरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान हिंदी कॉमेंट्री पॅनलचा भाग होता. टुर्नामेंट संपताच हरभजन चर्चेत आलाय. pic credit - pti/instagram/getty

11th March 2025

Created By: Dinanath Parab

प्रसिद्ध स्पोर्ट्स कॉमेंटेटर जतीन सप्रूने हरभजन विषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ती आता व्हायरल झालीय.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

जतीन सप्रूने हरभजनवर आरोप केला आहे. या दिग्गज क्रिकेटरसोबत काम करायचं नाही असं सप्रूने म्हटलय.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

"पूर्ण सन्मानाने, संबंधित अथॉरिटीला माझी विनंती आहे की, मला भज्जी सरांसोबत पार्टनर बनवू नका. त्यांनी बोलण्याची संधीच दिली नाही. हे योग्य आहे असं मला वाटत नाही" असं जतीन सप्रूने म्हटलय.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

हरभजन सिंगने सुद्धा जतीन सप्रूच्या या पोस्टला उत्तर दिलं आहे.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

हरभजन सिंगने एक पोस्ट शेअर करताना लिहिलय की, "मी काही बोलू दिलं नाही हा जतीन सप्रूचा आरोप खोटा आहे. मी आमचं फुटेज सार्वजनिक करण्याच आवाहन करतो"

11th March 2025

Created By: Dinanath Parab

जतीन सप्रू आणि हरभजन सिंगमध्ये नक्की काय झालय ते अजून स्पष्ट नाहीय. काही जण या पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. 

11th March 2025

Created By: Dinanath Parab