कोण आहे ही टीम इंडियाची 'गुड लक'? दुबई स्टेडियमवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं
10 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
टीम इंडियाने 9 मार्च रोजी न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एकीकडे या विजयाची चर्चा होत असताना, दुसरीकडे, एक मुलगी देखील चर्चेत आहे. जिने स्वतःला टीम इंडियासाठी 'गुड लक' म्हटलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, जो सामन्यानंतरचा आहे. व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत एक मुलगी दिसत आहे
ही मुलगी RJ महवश आहे. तिने स्वतः चहलसोबतचा तिचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "मी तुला सांगितलं होतं ना की मी जिंकवून देईन. मी टीम इंडियासाठी 'गुड लक' आहे"
RJ महवश सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर 17 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. ती सतत मजेदार व्हिडिओ पोस्ट करत असते
महवश अलीगढची आहे. ती अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तसेच तिने दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं आहे.
भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी महवश दुबईला पोहोचली होती. स्टेडियममध्ये चहलसोबत ती दिसताच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले
दोघांची नावे आधीही जोडली गेली आहेत. 2024 मध्ये, ख्रिसमसच्या निमित्ताने, तिने चहलसोबतचा एक फोटो शेअर केला होता, तेव्हापासून दोघांचीही नावे चर्चेत आहेत.