मला विश्वासच होत नाहीये..; लाडक्या लेकीसाठी मोहम्मद शमीची भावूक पोस्ट

17 July 2025

Created By: Swati Vemul

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे सध्याच्या इंग्लंड दौऱ्याचा भाग नाही

दुसरीकडे कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला धक्का दिला, शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला पोटगी देण्याचे आदेश

कोर्टाच्या आदेशानुसार, शमीला त्याच्या पत्नीला दरमहा 1.5 लाख रुपये आणि मुलगी आयराला 2.5 लाख रुपये द्यावे लागणार

अशातच मुलीच्या दहाव्या वाढदिवशी शमीने भावनिक पोस्ट लिहिली

मला अजूनही आवठवतंय, जेव्हा आपण जागे राहायचो, गप्पा मारायचो, हसायचो आणि विशेष म्हणजे मी तुला नाचताना पाहायचो- शमी

मला विश्वास बसत नाहीये की तू इतक्या लवकर मोठी होत आहेस- शमी

आयुष्यात तुला फक्त चांगल्या गोष्टी मिळो, ही माझी देवाकडे प्रार्थना. देव तुला नेहमीच प्रेम, शांती, आनंद आणि चांगलं आरोग्य देवो- शमी

मोहम्मद शमीची मुलगी आयरा तिच्या आईसोबत राहते

हसीन जहाँने शमीवर मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, मॅच फिक्सिंगसारखे अनेक आरोप केले

तेव्हापासून शमी आणि हसीन जहाँ वेगळे राहतात, सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे

तू शर्टलेस दिसता कामा नये..; आर. माधवनची मुलाला सक्त ताकीद