प्रीती झिंटा की काव्या मारन, जास्त श्रीमंत कोण ?

15 April 2025

Created By : Manasi Mande

सध्या देशात IPLची धूम सुरू असून ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ कसून प्रयत्न करतोय.

प्रत्येक टीमचे चाहते त्यांच्या संघाला मनापासून सपोर्ट करताना दिसतात.

याचदरम्यान पंजाब किंग्सची प्रीती झिंटा आणि सनरायजर्स हैजराबादची मालक काव्या मारनही प्रचंड चर्चेत आहेत.

दोघीही मैदानात हजर राहून आपल्या टीमला फुल्ल सपोर्ट करताना दिसतात.

पण प्रीती आणि काव्या यांच्यापैकी अधिक श्रीमंत कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यांचं नेटवर्थ किती ते जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रीती झिंटाची वार्षिक कमाई अंदाजे 185 कोटी रुपये आहे. तर तिच्या टीमचे व्हॅल्यूएशन 900 कोटींच्या आसपास आहे.

तर सनरायजर्स हैदराबादच्या काव्या मारनचे नेटवर्थ सुमारे 410 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

रिपोर्ट्सनुसार, काव्या मारन ही प्रीती झिंटापेक्षा अधिक श्रीमंत आहे, काव्याचा बिझनेस जास्त मोठा आहे.