डिनरची ऑफर नाकारणं अँकरला पडलं भारी; सोडावी लागली प्रीमियर लीग

11 February 2025

Created By: Swati Vemul

आर्थिक समस्यांचा सामना करणारी बांग्लादेशी प्रीमियर लीग (BPL) सतत वादाच्या भोवऱ्यात

आता भारतीय वंशाची कॅनेडियन स्पोर्ट्स अँकर येशा सागरने बीपीएलला सोडलंय

येशा सागरवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत नोटीस बजावली होती

त्यानंतर तिला बांग्लादेशी प्रीमियर लीगमधून बाहेर पडावं लागलं

येशा बीपीएलमध्ये चटगांव किंग्स टीमशी जोडलेली होती

कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत फ्रँचाइजी मालक समीर कादर चौधरीने तिला नोटीस बजावली

अधिकृतरित्या आमंत्रित करूनही डिनरला उपस्थित न राहिल्याने येशावर कारवाई

प्रायोजकांचं शूट आणि प्रमोशन शूटआऊटसुद्धा पूर्ण न केल्याचा येशावर आरोप

येशाच्या अनुपस्थितीमुळे चटगांव किंग्स फ्रँचाइजीचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप

नोटिशीला उत्तर देत येशाने टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

'हम आपके है कौन'मधली रिटा आता दिसते अशी; ओळखूही शकणार नाही