चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा मोठा मॅच विनर ठरला. किताब जिंकल्यानंतर त्याची एक पोस्ट व्हायरल झालीय. pic credit - pti/instagram/getty

11th March 2025

Created By: Dinanath Parab

वरुण चक्रवर्ती यांच्यासाठी मागचे काही महिने खास होते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अखेरच्या क्षणी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

वरुण चक्रवर्ती या टुर्नामेंटमध्ये 3 सामने खेळला. 15.11 च्या सरासरीने त्याने 9 विकेट काढले. तो भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी लेग स्पिनर अबरार अहमदने इन्स्टाग्रामवर चहा पितानाचा एक फोटो पोस्ट केलेला. कॅप्शनमध्ये त्याने रमजानचे रोजे सुरु होण्याआधी शानदार संध्याकाळी चहाचा शेवटचा कप असं लिहिलेलं.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

अबरारने कॅप्शनमध्ये FANTASTIC आणि TEA हे शब्द वापरलेले. याचा संबंध 2019 च्या घटनेशी आहे. भारतीय फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असताना टी इज फॅनटास्टिक म्हटलं होतं. भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानात हा शब्द वापरतात. 

11th March 2025

Created By: Dinanath Parab

वरुण चक्रवर्तीने आता आपल्या एका पोस्टद्वारे अबरार अहमदला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसह कॉफी पितानाचा फोटो वरुणने पोस्ट केलाय.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

वरुण चक्रवर्तीने फोटो शेअर करताना लिहिलय की, 'या कपचा स्वाद घेण्यासाठी खूप लांब यावं लागलं'

11th March 2025

Created By: Dinanath Parab