ईडन गार्डन्समध्ये नाही होणार विराटच्या बर्थडेचे सेलिब्रेशन ! (Photos : Instagram)

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो. याच दिवशी भारत वि. दक्षिण आफ्रिका मॅच आहे.

कलकत्त्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या मॅचदरम्यान विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनची पूर्ण तयारी झाली होती.

पण सौरभ गांगुलीच्या या शहरात आता विराटचा वाढदिवस साजरा होणार नाही, असे वृत्त आहे.

रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांसाठी मास्क्स, केक कटिंग आणि फटाक्यांची तयारी करण्यात आली होती.

पण ऑथॉरिटीने हे सर्व करण्यास परवानगी न दिल्याने हे सेलिब्रेशन होणार नाही.

आता विराटच्या वाढदिवशी फक्त फटाके फोडण्यात येतील. मास्क आणि केक कटिंग होणार नाही असे वृत्त आहे.

यामुळे फॅन्स तर निराश झाले असतील. 

पण त्या दिवशीच्या मॅचमध्ये विराटने धावांची बरसात करावी, अशीच सर्वांची इच्छा असेल.

हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?