निवृत्तीनंतर सानिया मिर्झाला पेन्शन का मिळत नाही?

12 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने फेब्रुवारी 2023 मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिच्या कारकिर्दीत तिने तीन ग्रँड स्लॅम महिला डबल्स विजेतेपद जिंकले आहेत.

तिची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं

भारतातील टेनिस हा खेळ अखिल भारतीय टेनिस असोसिएशन (AITA) द्वारे नियंत्रित केला जातो. एआयटीएकडे खेळाडूंसाठी पेन्शन योजना नाही.

त्यामुळे सानिया मिर्झाला निवृत्तीनंतर कोणतेही पेन्शन मिळत नाही. निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने हैदराबादमध्ये स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली आहे.

सानिया अनेक ब्रँड्ससोबत जाहिरातींद्वारे पैसे कमवते. सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत अनेक व्यावसायिक गुंतवणूक देखील केली आहे.

तिला फॅशन आणि फिटनेस क्षेत्रात खूप रस आहे. तिने स्वतःचे ब्रँड आणि उत्पादने देखील लाँच केली आहेत, ज्यातून ती भरपूर कमाई करते.

सानिया आणि शोएब मलिक यांचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी झाले होते. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर,2024 ला दोघांचा घटस्फोट झाला.