भारतात 8 जुलै रोजी नवीन ब्रँडचा फोन लॉन्च होत आहे. त्याचे नाव Ai+ आहे. हा ब्रँड दोन स्वस्त हँडसेट बाजारात आणत आहे.

7 July 2025

ईकॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर  Ai+ हँडसेट लिस्टेड आहे. हा फोन 8 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता लॉन्च होणार आहे.

Ai+ भारतात दोन हँडसेट लॉन्च करणार आहे. एकाचे नाव Ai+ Plus तर दुसऱ्याचे नाव Ai+ Nova 5G आहे.

Flipkart वर लिस्टेड डिटेल्समधून Plus हँडसेटची प्राथमिक किंमत 5 हजार रुपये असणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही हँडसेटचे काही डिटेल्ससुद्धा कन्फर्म केले गेले आहे.

Ai+ Plus मध्ये डुअल रिअर कॅमेरा असणार आहे. तसेच 50MP चा प्रायमरी कॅमेरा असणार आहे.

Ai+ Plus 5 कलर व्हेरिएंटमध्ये असणार आहे. या हँडसेटमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. 

दोन्ही व्हेरिएंटमध्ये कॅमेरा, बॅटरीसारखी असणार आहे. तसेच 1TB पर्यंत स्टोरेज असणार आहे.