05 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
एअर टेलच्या अधिकृत वेबसाईटवर अनेक रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्त रिचार्ज जो अनेक फायदे देतो त्याची माहिती घेणार आहोत.
Airtel चा 199 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये कमी किंमतीत अनेक सेवा मिळतात.
एअरटेलच्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा मिळतो. ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटची मजा घेऊ शकता.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा सपोर्ट मिळतो.लोकल, STD आणि रोमिंगमध्ये मोफत संवाद साधता येतो.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये रोज 100 SMS देखील मिळतात. ज्याने तुम्ही मॅसेज पाठवू शकता.
199 रुपयांच्या या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. याच्या मदतीने तुम्ही जवळपास एक महिना सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.
एअरटेलच्या रिचार्ज पॅक सोबत Adobe Express चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते. इतक्या कमी किंमतीत हा एक चांगला फायदा मिळतो.
स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी एअरटेलचे सेफ नेटवर्क फिचर देखील मिळते. याच्या मदतीने स्कॅम कॉलचा शोध घेता येतो.
हा रिचार्ज पॅक त्या लोकांसाठी चांगला प्लान आहे जे कमी पैशात संपूर्ण डेटा पॅक आणि गरजेच्या सेवांचा फायदा घेऊ इच्छीतात.