पावसात लॅपटॉप भिजल्यास या 5 चुका टाळा

19 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

पावसात लॅपटॉप भिजल्यास घाबरुन न जाता समजुतीने पाऊलं उचला. कारण काही चुकांमुळे लॅपटॉप बिघडू शकतो.

लॅपटॉप पावसात भिजल्यानंतर  अनेक जण सुरु करुन पाहतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन लॅपटॉप खराब होऊ शकतो.

भिजलेला लॅपटॉप जोरजोरात पुसु नका. त्यामुळे स्क्रीन किंवा इतर दुसरे पार्ट खराब होऊ शकतात.

भिजलेल्या लॅपटॉपला चार्ज करण्याचा प्रयत्न करु नये. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते.

लॅपटॉप कोरडा करण्यासाठी ड्रायर वापरतात.  त्यामुळे सर्किट जळू शकतो. 

लॅपटॉप जास्तच भिजला असेल तर स्वत: न उघडता तज्ज्ञांची मदत  घ्या. लॅपटॉप सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा.

लॅपटॉप भिजला असेल तर लगेचच त्याला उलटा करा, ज्यामुळे पाणी बाहेर निघू शकेल. तसेच 24-48 तास लॅपटॉपसह काहीच करु नका.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?