31 october 2025
Created By: Atul Kamble
देशी स्मार्टफोन मेकर कंपनी लाव्हाने बजेट फोन शार्क-2 लाँच केला आहे. याच्या स्पेसिफिकेशनवर एक नजर टाकूया
स्मार्टफोन 4GB रॅम+64GB स्टोरेज सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. याची किंमत 7,500 रुपये आहे
Lava च्या या फोनचा लुक आयफोन -16 शी मिळता जुळता आहे. ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे.
डिस्प्ले - लाव्हाच्या या फोनमध्ये 6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले दिलेला असून त्याचे रिझोल्युशन 750*1612 पिक्सेल आहे.
ऑक्टो-कोर युनिसोक T7250 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन 2 आऊट ऑफ द बॉक्स एंड्रॉईड 15 सोबत जोडलेला आहे.
4GBव्हर्च्युअल रॅमचे तंत्र असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAhची बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंग सपोर्टवाली आहे.
लाव्हा शार्क 2 मध्ये IP54 डस्ट आणि वॉटर रेटींग आहे. पाण्याच्या हलक्या थेंबापासून संरक्षण आहे.मात्र पाण्यात टाकल्यास खराब होऊ शकतो.
ग्राहकांना हा फोन ऑनलाईन मिळणार नाही. याची विक्री केवळ ऑफलाईन दुकानातूनच केली जात आहे.
गोल्ड आणि ग्रे कलरमध्ये लाँच झालेल्या या फोनला 3.5mm हेडफोन जॅक,युएसबी टाईप-C पोर्ट आणि स्पिकर ग्रीलही आहे.