मोबाईल पाण्यात पडला तर चिंता नको, अशा पद्धतीने नीट होईल..
12 April 2026
जर तुमचा मोबाईल पाण्यात गेला तर घाबरण्याची काही गरज नाही.
योग्य वेळी केलेल्या उपायांनी तुमचा मोबाईल पाण्यात पडूनही वाचू शकतो.
मोबाईलमध्ये पाणी गेल्याचे कळताच तो आधी बंद करा,म्हणजे शॉर्ट सर्कीट होणार नाही.
सिमकार्ड, मेमरी कार्ड आणि कव्हर लागलीच बाहेर काढावे
ओला फोन असताना कधी चार्जर लावण्याची चूक करु नका, हे धोकादायक ठरु शकते.
फोनच्या बटणांना वारंवार दाबू नका याने पाणी मोबाईलमध्ये जाऊ शकते
एका कोरड्या आणि सुती कपड्याने फोनला चांगले कोरडे करावे.
फोनला २४ ते ४८ तासांसाठी कोरड्या तांदळाच्या डब्यात वा सिलिका जेल पाऊचमध्ये दाबून ठेवा.
फोन संपूर्ण सुकल्याशिवाय ऑन करण्याची घाई करु नका, अन्यथा मदरबोर्ड खराब होऊ शकतो.
कमजोर हाडांना मजबूत बनवण्यासाठी हे उपाय कामी येतील