गूगल एआय सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. कंपनीने जॅमिनी AI Pro ची सदस्यता मोफत देण्याची योजना आणली आहे. 

20 July 2025

गूगल जेमिनी AI Pro च्या सदस्यत्वेसाठी महिन्याला 1950 रुपये खर्च येतो. पण कंपनी वर्षभरासाठी हे मोफत देत आहे.

गूगलचे हे एआय सर्वांना मोफत मिळणार नाही. फक्त विद्यार्थ्यांसाठी गूगलने ही ऑफर दिली आहे. 

विद्यार्थी नोकरीच्या मुलाखतींपासून ते क्रियटीव्ह आयडीया शोधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी जेमिनीचा वापर करु शकतात.

Gemini AI Pro प्लॅनमुळे यूजर्स अनलिमिटेड होमवर्क, परीक्षेची तयारी आणि रायटिंग असिस्टेंस म्हणून वापर करता येणार आहे.

Gemini AI Pro कंपनीचा लेटेस्ट AI मॉडल आहे. त्याच्यासोबत गूगल क्लाउड स्टोरेज मोफत मिळणार आहे.

Gemini AI Pro मोफत वापरण्यासाठी, तुम्हाला गुगल जेमिनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला फ्री अपग्रेडचा पर्याय मिळेल.

तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल. विद्यार्थी असल्याची पडताळणी करावी लागेल.

गुगल 15 सप्टेंबरपर्यंत जेमिनी एआय प्रो चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या ऑफर अंतर्गत दोन टीबी स्टोरेज मिळणार आहे.

Gemini, Notebook LM, Gmail मध्ये Gemini सारख्या वैशिष्ट्यांचे फायदे मिळतील. विद्यार्थी असल्याची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला ही ऑफर मिळेल.