लॅपटॉपचा स्पीड कमी झालाय? या ट्रीक लक्षात ठेवा, लॅपटॉप सुपराफास्ट चालेल
22 जुलै 2025
Created By: संजय पाटील
लॅपटॉप संथपणे चालत असेल तर चिंता करण्याची गरज नाही. काही टीप्स जाणून घेऊयात ज्यामुळे तुमची मदत होईल.
लॅपटॉपचा वेग कमी होण्यामागे एक नाही तर असंख्य कारणं असू शकतात.
लॅपटॉपचा वेग कमी झाला असेल तर हार्ड डिस्कला SSD सह बदलून घ्या, कारण हार्ड ड्राईव्हच्या तुलनेत SSDचा वेग अधिक असतो.
लॅपटॉपमधील कमी रॅम हे देखील स्पीड कमी असण्यामागचं कारण असू शकतं. त्यामुळे रॅम वाढवा.
लॅपटॉपमध्ये नको असलेला डेटा, फाईल्स आणि इतर गोष्टी आताच डिलीट करुन टाका.
Malware आणि Virus मुळे लॅपटॉप स्लो चालतो. त्यामुळे चांगल्यातला चांगला एंटीव्हायरस घ्या आणि सिस्टममधून व्हायरस हटवा.
Temp Files लॅपटॉपमध्ये जमा होऊ लागल्यास त्याचा लॅपटॉपच्या वेगावर परिणाम होतो. ctrl+r प्रेस केल्यानंतर %temp% असं लिहून Enter करा. टेंपररी फाईल्स डिलीट करा.
टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?