5 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
पावसाचे दिवस आहेत आणि फोन पाण्यात भिजण्याची शक्यता असते. पण वेळीच पावलं उचलली तर तुम्ही फोन खराब होण्यापासून वाचवू शकता.
आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगतो त्यामुळे तुम्हाला घरात स्मार्टफोन व्यवस्थित करता येईल.
तुमचा फोन पावसात भिजला तर पहिल्यांदा फोन बंद करा. फोन सुरु असल्यास शॉर्ट सर्किटचा धोका असतो.
फोन लगेच ऑन करण्याची किंवा चार्जिंगला लावण्याची घाई करू नका. यामुळे बॅटरी किंवा बोर्ड खराब होऊ शकतो.
फोन बाहेरून कोरड्या कपड्याने किंवा टिश्यूने स्वच्छ पुसून घ्या. कच्च्या तांदळाच्या हवावंद बॉक्समध्ये ठेवा. किमान 24 चे 48 तास असंच ठेवा.
तुमच्याकडे सिलिका जेलची पॅकेट्स असतील तर तांदळाऐवजी ती वापरा. ती ओलावा शोषून घेण्यास प्रभावी आहेत.
असं सगळं केल्यानंतरही फोन व्यवस्थित काम करत नसेल तर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला दाखवा.