6 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
तुम्हाला जुन्या फोनमधून नव्या फोनमध्ये डेटा ट्रान्सफर करायचा आहे का? मग ट्रिक फॉलो करा.
सर्वात आधी तुम्हाला जुन्या अँड्रॉईड फोनच्या सेटिंग्ज एपवर जाऊन अकाउंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
येथे तुम्हाला नव्या स्मार्टफोनमध्ये वापरायचं गुगल अकाउंट निवडावं लागेल. आता अकाउंट सिंक किंवा सिंक अकाउंट बटणाच्या पर्यायावर क्लिक करावं.
नव्या पेजवर दिसणाऱ्या ऑप्शनच्या कॉन्टॅक्टचं टोगल ऑन करावं लागेल. टॉगल ऑन केल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल आरामात नव्या डिव्हाइसमध्ये जातील.
नव्या डिव्हाईसचा वापर करण्यापूर्वी जुनं गुगल अकाउंट लॉग इन करा. लॉग इन केल्यावर नव्या डिव्हाइसवर कॉन्टॅक्ट डिटेल्स सिंक करा.
असं करताच जुन्या मोबाईलमधील सर्व सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट डिटेल्स नव्या स्मार्टफोनमध्ये येतील.
वापरकर्त्याची सर्व माहिती गुगल खात्यात सेव्ह असते. त्यामुळे गुगल खात्यातील सेव्ह डेटा कोणत्याही मोबाईलमध्ये एक्सेस करू शकता.