स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप निट चालत नाहीय? 'इथे' असू शकते गडबड
9 जून 2025
Created By: संजय पाटील
व्हॉट्सॲप आयुष्याचं अविभाज्य भाग आहे. मात्र अनेकदा व्हॉट्सॲप निट काम करत नाही. त्यामुळे अनेकदा अडचण होते.
तुम्ही स्वत:देखील व्हॉट्सॲप निट चालावं यासाठी प्रयत्न करु शकता. आपण या निमित्ताने 5 सोल्यूशन जाणून घेऊयात, ज्यामुळे व्हॉट्सॲप निट चालू शकतं.
व्हॉट्सॲपसाठी हायस्पीड इंटरनेटची गरज असते. तसेच वाय-फाय, डेटा ऑन आहे की नाही? हे पाहा. व्हॉट्सॲप संथपणे चालत असेल तर मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून रिस्टार्ट करा.
मोबाईलमध्ये बॅकग्राउंडला Apps सुरु असतात. त्यामुळे व्हॉट्सॲप निट काम करत नाही. त्यामुळे स्मार्टफोन एकदा रिस्टार्ट करा आणि व्हॉट्सॲप सुरु करा.
व्हॉट्सॲपचं जुनं व्हर्जन असल्यास ते क्रॅश होऊ शकतं. त्यामुळे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करा.
कॅशे फुल झाल्यास व्हॉट्सॲप संथपणे चालू शकतं. त्यामुळे अँड्राईड यूजर्स settinhg>apps>whatsapp>storage>clear cache मध्ये जाऊन कॅशे क्लिअर करा.
चुकीच्या वेळेमुळे अनेकदा व्हॉट्सॲप सर्व्हर कनेक्ट होण्यास अडचण येते. त्यामुळे अचूक तारीख आणि वेळ सेट करा.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या