10 september 2025
iPhone 17 लाँच होताच iPhone 16 झाला स्वस्त झाला आहे. एप्पलच्या ऑफिशियल पोर्टलवर आयफोन 16 ची किंमत 10 हजाराने कमी झालीय
ऑफिशियल पोर्टलवर आयफोन 16 ची किंमत आता 69,900 रुपये आहे.यात इंटर्नल स्टोरेज 128GB आहे. आधी याची किंमत 79,900 होती
एप्पल पोर्टलवर iPhone 16 खरेदी केल्यास बँक ऑफरही आहे, यात पाच हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आहे. निवडक बँक कार्डवर ही ऑफर आहे.
आयफोन 16 त 6.1 Inch चा super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी सेरॅमिक शिल्डचा वापर केलाय, कॉम्पॅक्ट साईजचा हा फोन प्रसिद्ध आहे
आयफोन 16 त एप्पल A18 (3nm) चिपसेट आहे.चांगल्या ग्राफीक्ससाठी एप्पल GPU (5-core graphics) चा युज केला आहे.
आयफोन 16 त ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी 48MP सेंसर आणि सेकंडरी 12MP सेंसर आहे. 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे
आयफोन 16 प्लसची किंमतही घटलीय. 128GB व्हेरिएंटची किंमत आता 79,900 रुपये झालीय. आधी 89,900 रुपये होती.
आयफोन 16 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. आयफोन 16 आणि 16 प्लस व्हेरिएंटमध्ये डिस्प्लेचा फरक आहे.
आयफोन 17 सिरीजमध्ये Plus व्हेरिएंटला लाँच केलेले नाही. यावर्षी कंपनीने iPhone Air लाँच केले आहे.हा Apple चा सर्वात स्लीम आयफोन आहे. त्याची जाडी 5.6 mm आहे.