iPhone SE4 बजेट फोन पुढील आठवड्यात लाँच होणार?, किंमत आणि फिचर्स लिक झाले

8 february 2025

Created By:  atul kamble

 ब्लुमबर्गनुसार Apple नवा बजेट स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे

iPhone SE4 बजेटफोन चर्चा सुरु आहे, परंतू Apple ने अधिकृत माहीती दिलेली नाही

कंपनी या फोनला स्मार्टफोन सॉफ्ट लाँच करु शकते,  म्हणजे इव्हेंट न करता केवळ ऑनलाईन लाँचिंग करु शकते

 iPhone SE4 चा फ्रंट लूक iPhone 14 सारखा असू शकतो, नॉच वाला डिस्प्ले आणि टच आयडी ऐवजी फेस आयडी असेल

यात A18 प्रोसेसर दिले आहे, जर या प्रोसेसरचा वापर केला तर Apple इंटेलिजन्स देखील असेल

या फोनचा एक कथित व्हिडीओ एक्सवर लिक झालाय, Majin Bu नावाच्या युजरने शेअर केलाय

लिक व्हिडीओनुसार यात टाईप सी चार्जिंग पोर्ट, 48MP चा सिंगल रिअर कॅमेरा असू शकतो

या फोनची किंमत 500 डॉलर  म्हणजे भारतीय बाजारात 50 हजाराच्या आसपास असेल असे म्हटले जातंय

अखेरचा iPhone SE3 साल 2022 मध्ये लाँच झाला होता, कंपनीला याला लवकरच अपडेट करेल