Jio चा स्वस्त रिचार्ज, डेटावर नाही कोणतीही डेली लिमिट
9 April 2026
रिलायन्सचा एक खास प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. ज्यात डेटावर कोणतीही डेली लिमिट नाही.हा एक मासिक प्लान आहे.
सर्वसाधारणपणे रिचार्जमध्ये डेली लिमिटसह डेटा मिळतो. जर पूर्ण एक दिवस डेटा युज केला नाही तर तो वाया जातो.
जिओ युजर्ससाठी एक खास प्लान आहे. रिचार्ज सोबत पूर्ण 25GB डेटा मिळतो.याची किंमत 365 रुपये आहे.
युजर्स हवा तेव्हा डेटा वापरु शकतात. एका दिवसात संपूर्ण डेटा खर्च करु शकतात. वा त्याला पुढच्या दिवशी वापरु शकतात.
जिओचा 365 रुपयांचा हा रिचार्ज प्लान संपूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो.
जिओच्या या 365 रुपयांच्या रिचार्जने अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा समावेश आहे.
जिओच्या 365 रुपयांच्या प्लानमध्ये 1OO SMS चा एक्सेस मिळतो.या प्लानमध्ये 7.47 रुपयांचा टॉकटाईम मिळतो.
365 रुपयांचा रिचार्ज प्लान ऑफिशियल पोर्टल आणि माय जिओ एपवर लिस्ट आहे. प्रीपेड सेगमेंटच्या आत व्हॅल्यू कॅटगरीत जाऊन तेथे अफोर्डेबल सब सेक्शनमध्ये हा रिचार्ज आहे.
यात तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन आणि जिओ एआय क्लाऊड अंतर्गत 50 जीबी डेटा स्टोअरेज मिळतो.