जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही 

13 DEC 2025

- जिओ प्रीपेड आणि पोस्ट पेड दोन्ही सेवा देते. जर तुम्हाला जिओचा पोस्ट पेड प्लान हवा असेल तर अनेक पर्याय आहेत.

 कंपनीचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ३४९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग आणि SMS तिन्ही फायदे मिळतात.

लक्षात घ्या हा जिओचा वैयक्तिक प्लान आहे. यात तुम्हाला फॅमिली ऐड ऑनची सुविधा नाही.

 ३४९ रुपयांच्या पोस्ट पेड प्लानमध्ये तुम्हाला ३० GB डेटा पूर्ण व्हॅलिडीटी सह मिळेल,त्यानंतर तुम्हाला १० रुपये प्रति GB द्यावे लागतील.

यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात एडीशनल फायदे देखील आहेत.

जिओ स्पेशल ऑफर अंतर्गत JioHostar ( Mobile/TV)चा तीन महिन्याचा सब्सक्रिप्शन देत आहे.

या शिवाय कंपनी JioHome चे दोन महिन्याचा फ्री ट्रायल देत आहे. JioAICloud अंतर्गत 50GB स्टोरेज तुम्हाला फ्री मिळेल.

 जिओच्या या प्लान सोबत तुम्हाला १८ महिन्याचा Google Gemini Pro प्लान फ्री मिळेल.याची किंमत 35,100 रुपये इतकी आहे.

खास बाब म्हणजे जिओचा हा प्लान अनलिमिटेड 5G डेटा देतो.जिओ हॉटस्टारच्या सब्सक्रिप्शनसाठी तुम्हा दर महिन्याला रिचार्ज करावा लागणार आहे.