लाव्हा smart 4 Plus सिरीज, तरुणाईसाठीचा स्मार्ट फोन

20 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

इंडियन स्मार्टफोन मेकर लाव्हाने आपल्या स्मार्ट सिरीजमध्ये Smart 4 Plus स्मार्टफोन लाँच केलाय

 हा 'नो टेन्शन' टॅगलाईनवाला डिव्हाईस तरुणांसाठी डिझाईन केला आहे. ज्यांना कमी किंमतीत स्टायलिश, भरोसेमंद आणि स्मूथ मोबाईलचा अनुभव हवा आहे.

 एचडी प्लस डिस्प्ले -  Smart 4 Plus स्मार्टफोनमध्ये 6.75 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

कॅमेरा असेंबली - स्मार्ट 4 प्लसमध्ये 13 MP चा एआय कॅमेरा आहे.सेल्फीसाठी 5 MP सेंसर आहे

 डिव्हाईस नॅनो+नॅनो सिम कॉन्फिगरेशनद्वारे ड्युअल सिम( 4G+4G)कनेक्टिव्हीटी सपोर्ट करतो.यात कॉन्फ्रन्स कॉलिंग, एनॉनिम कॉल रेकॉर्डिंग आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारखे फिचर्स आहेत.

Android 15 Go -  Android 15 Go वर चालणारा  Smart 4 Plus स्मार्टफोन दोन वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह येतो.

ऑक्टा-कोर प्रोसेसर - डिव्हाईस, UNISOC 983A ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. या डिव्हाईसमध्ये 4GB RAM आहे. ज्याला 4GB व्हर्च्युअल RAM पर्यंत वाढवता येते. 64GB चा इंटर्नल स्टोरेजही आहे.

Lava smart 4 plus मध्ये  5000mAh ची बॅटरी असून Type-c पोर्ट आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे.