मोबाईल बॅटरी वाचवण्यासाठी आताच बदला ही सेटिंग
11 जून 2025
Created By: संजय पाटील
मोबाईलची चार्जिंग लवकर संपत असेल तर या ट्रिक्स वापरा, ज्यामुळे चार्जिंग लवकर संपणार नाही
ब्राईटनेस वाढवल्याने चार्जिंग लवकर संपते, ऑटो ब्राईटनेस ऑन केल्याने स्कीन ब्राईटनेस गरजेनुसार कमी जास्त होतो.
बॅटरी लो होते तेव्हा Low Power Mode ऑन करा. यामुळे बॅकग्राउंडमध्ये सुरु असलेल्या Apps वर मर्यादा येते.
gps, Bluetooth आणि wifi कायम सुरु ठेवल्यास चार्जिंग लवकर संपते. गरज नसल्यास ब्लुटुथ, वायफाय बंद करा.
मोबाईल स्क्रिन जास्त वेळ ऑन राहिल्यास चार्जिंग जास्त संपते. त्यामुळे स्क्रीन टाईमआऊट 15-30 सेंकदांवर सेट करा.
काही apps बॅकग्राउंडमध्ये सुरु असल्याने चार्जिंग संपते. त्यामुळे सेटिंगमध्ये battery>background activity मध्ये जाऊन गरजेचे नसलेले apps बंद करा.
मोबाईलमधील Animation आणि प्रत्येक टचवर वायब्रेशन बॅटरी संपते. त्यामुळे ही सेटिंग ऑफ करा किंवा मिनिमम सेट करा.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा