सेकेंड हँड मोबाईल खरेदी करताना बना स्मार्ट, नायतर नुकसान अटळ!

21 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

सेकेंड हँड मोबाईल घेताना सतर्क राहणं गरजेचं आहे, अन्यथा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

कमी किंमतीत सेकेंड हँड मोबाईल मिळतोय म्हणून  आनंदी होण्याऐवजी  काही गोष्टी लक्षात ठेवा.

सेकेंड हँड मोबाईल वॉरंटीत असेल तर घ्या, जेणेकरुन नंतर एखादा पार्ट खराब झाला तर खिसा हलका करावा लागणार नाही.

सेकेंड हँड मोबाईल घेतल्यावर आधी तो फॉर्मेट मारा, ज्यामुळे मोबाईलमध्ये मालवेअर व्हायरस असल्यास संभाव्य धोका टळेल.

पैसे देण्याची घाई करु नका, मोबाईल चांगल्या स्थितीत आहे की नाही, कुठे क्रॅक आहे का? हे निट पाहून घ्या.

मोबाईल फार जुना असेल तर घेणं टाळा, कारण जुन्या मोबाईलला सिक्योरिट अपडेट्स मिळत नाहीत.

सेकेंड हँड मोबाईल घेण्याआधी वेगवेगळ्या साईट्सवर त्याची किंमत किती आहे? हे आवर्जून तपासा.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?