धुलीवंदन, रंगपंचमी हे रंगाचे उत्सव सुरु आहे. वसंत ऋतूच्या रंगात हे उत्सव अधिक आनंदीदायी असतात.

14 March 2025

होळीत किंवा इतर दिवशी तुमचा स्मार्टफोन पाण्यात गेल्यावर काय करावे? पाहू या काही टीप्स

फोन पाण्यात गेल्यावर घाईघाईत कोणतेही पाऊल उचलून नका. यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवा.

फोन पाण्यात पडला किंवा फोनमध्ये पाणी गेले तर आधी त्याला पाण्यातून बाहेर काढा. कारण जितका वेळ फोन पाण्यात राहील तितका खराब होईल. 

फोन पाण्यातून काढल्यावर आधी त्याला स्वीच ऑफ करा. त्यामुळे शॉर्ट सर्किट होणार नाही. 

फोन बंद केल्यावर फोनचे कव्हर, एसडी कार्ड, सीम कार्ड बाहेर काढून घ्या. त्यानंतर सॉफ्ट कापडाने फोन पुसून घ्या.

तुम्ही फोनला गरम करु नका किंवा हलवू नका. अन्यथा पाणी आत जाण्याचा धोका असतो. गरम केल्यामुळे फोनचे अनेक पार्ट खराब होऊ शकतात. 

फोनसाठी सिलिका जेलचा वापर करा. त्यामुळे फोनमध्ये असलेला ओलसरपणा निघून जाईल. 

जवळपास 48 तास फोन बंद ठेवा. त्यानंतर तो सुरु करा. या दरम्यान फोन चार्जसुद्धा करु नका. 

फोन सुरु झाल्यास प्रश्नच नाही पण फोन ऑन झाला नाही तर सर्व्हिस सेंटरमध्येच घेऊन जा.