WhatsApp Status मध्ये होणार बदल,कोणते फिचर येतेय पाहा

28 september 2025

Created By: Atul Kamble

WhatsApp एक नवीन फिचर आणतेय,हे फिचर व्हॉट्सस्टेटसवर आणखीन नियंत्रण देणार आहे

मेटा आपल्या या प्लॅटफॉर्मवर खास फिचर आणतेय,यामुळे आपल्याला आपले स्टेटस मॅसेज करायचा पर्याय मिळेल

 म्हणजे स्टेटस लावणाऱ्याला त्याच्या स्टेटसला कोण रिशेअर करणार ते ठरवता येणार आहे.कोणी एखाद्याचे स्टेटस रिशेअर केले तर ओरिजनल ऑथरची माहिती त्यावर दिसणार नाही.

 WABetaInfo ने या फिचर WhatsApp Beta च्या एड्रॉईड व्हर्जन 2.25.27.5 वर स्पॉट केलेय.मेटा या फिचरला येत्या काही दिवसात रिलीज करु शकते

 याचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे.त्यानुसार युजर्सना स्टेटस शेअरची मंजूरी देण्याचा पर्याय मिळेल

 Allow Sharing ऑप्शनवर टॅप करताच तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस शेअरिंगचा पर्याय देऊ शकता.हा ऑप्शन एड्रॉईड बिटा व्हर्जनवर मिळत आहे

 मात्र,हे फिचर बाय-डिफॉल्ट ऑफ रहाणार,तुम्हाला हे मॅन्युअली ऑन करावे लागेल, तेव्हाच ते तुम्हाला वापरता येईल

या फिचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर जास्त नियंत्रण मिळेल.ते ठरवू शकतील की त्यांचे स्टेटस कोणाला रिशेअर करता येणार 

 बातमीनुसार युजर्सना व्युईंग ऑप्शनची मर्यादा निश्चित करावी लागेल.म्हणजे ज्यांना तुमचे स्टेटस दिसेल तोच याच रिशेअर करेल