यूट्यूबने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 15 जुलैपासून लागू होणार आहे.
14 July 2025
यूट्यूबच्या या निर्णयामुळे काही YouTube Channels च्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
यूट्यूबच्या ज्या चॅनलमध्ये एआय कन्टेन आणि रिपीट होणारा कन्टेन असणार आहे, त्यांना नवीन धोरणाचा फटका बसणार आहे.
AI व्हॉयसओव्हर, स्टॉक फुटेजचा वापर करुन केलेले व्हिडिओ, काही बनावट आणि अनावश्यक कन्टेन कमाईतून वगळण्यात येणार आहे.
YouTube चे संपादकीय प्रमुख रेने रिची म्हणाले की, हा फक्त एक लहान आणि स्पष्ट बदल आहे. हा नवीन नियम नाही. रिपीट कन्टेन यापूर्वीही मोनेटाइजेशनसाठी अपात्र होता.
यूट्यूबने मोनेटाइजेशन धोरण बदलले आहे, परंतु मोनेटाइजेशनच्या अटींमध्ये कोणताही बदल केला नाही.
YouTube वर AI जनरेटेड कंटेन्टची संख्या वाढत आहे. यामुळे कंपनीला हा कन्टेन कमी करायचा आहे. ओरिजनल कंटेन्टला कंपनीकडून प्रेरित केले जाणार आहे.