'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..

 4 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

फरहाना भट्ट हीने 'लैला मजनू' आणि 'सिंघम अगेन' सारखे चित्रपट केलेत, कास्टिंग काऊच स्कॅम संदर्भात तिने तिचा धक्कादायक अनुभव सांगितलाय

फरहाना भट्ट बिग बॉस आणि खतरों के खिलाडी मालिकेने प्रसिद्धीस आली होती. 

बिग बॉस - १९ मुळे प्रसिद्धीस आलेल्या फरहाना हीने तिच्यावर गुदरलेला भयानक अनुभव नुकताच शेअर केला होता.

कश्मीरात १५ मार्च १९९७ मध्ये जन्मलेल्या फरहाना हीने सांगितले की करियरच्या सुरुवातीला एका महिलेने बॉलीवूडमध्ये काम देण्याच्या बहाण्याने तिला मुंबईत बोलावल्याची कहाणी सांगितली आहे.

तिला सांगितले की शुटींग सुरु होणार आहे, हॉटेलमध्ये सोय आहे. परंतू मुंबईत पोहचल्यानंतर तिला एका दिग्दर्शकाकडे नेण्यात आले.

 मला तेथे रात्री कॉन्ट्रॅक्ट वाचण्यास देण्यात आले. त्यात एक अट होती की तिला अनेक दिवस दिग्दर्शकासोबत फॉर्म हाऊसवर रहावे लागेल.

 फरहाना म्हणाली, कॉन्ट्रॅक्ट वाचताच काही तरी गडबड असल्याची तिला जाणीव झाली. तिने त्या महिलेला फोन केला. डायरेक्टरने त्याच्या घरी मला बोलावल्याचे सांगितले.

त्याने मला रुममध्ये बसवून ठेवले.मी स्वत:च्या सुरक्षेसाठी फुलदानी हातात घेऊन ठेवली. मी माझ्या मित्राला सांगितले की काही गैरप्रकार झाला तर मी हल्ला करेन.

 फरहाना म्हणाली की मी त्या डायरेक्टरला कायमचा रामराम केला. आणि श्रीनगरचे तिकीट काढले.

 फरहाना नंतर कळले की त्या डायरेक्टरने अनेकांना फसवले होते. निर्मात्यांकडून पैसे घेऊन तो पळाला होता. मी थोडक्यात त्याच्या तावडीतून वाचल्याचे तिने सांगितले.