पापाराजींना Oops मोमेंटची प्रतिक्षा असते. पुरुषांच्या  बॉडी पार्टवर कॅमेऱ्याची लेन्स का जूम करत नाही?

मोना सिंह 'मुंज्या' चित्रपटाच प्रमोशन करतेय. यावेळी अभिनेत्रींना चुकीच्या  अँगलने शूट करण्याची तिने  निंदा केली.

महिला अभिनेत्रीच्या शरीराच्या भागांवर जूम इन केलं जातं. त्यांच्या परवानगी शिवाय चुकीच्या अँगलने  फोटो काढले जातात. 

महिलांच्या बॉडी पार्टवर चुकीच्या पद्धतीने फोकस केलं जात असं न्यूज 18 शी  बोलताना मोना सिंह म्हणाली. 

एखादा पुरुष चालताना त्याच्या प्रायवेट पार्टवर अशा पद्धतीने जून इन करणार का? नाही, ते असं करणार नाहीत. पण प्रत्येक महिलेबरोबर असं करतात. 

मला असं वाटत प्रत्येक महिला अभिनेत्रीने या विरोधात  आवाज उठवला पाहिजे.  काहीतरी चुकेल याची  त्यांना प्रतिक्षा असते. 

अभिनेत्री नेहा शर्माने सुद्धा चुकीच्या अँगलने फोटो काढण्यावर टीका  केली होती.