बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा आपण काही कपल्सचा रोमान्स पाहिला आहे.

21 November 2023

कपल्सचा रोमान्स बऱ्याचदा कॅमेऱ्यात कैद झालाय.  

इंटीमेट सीनवरुन बऱ्याचदा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, बिग बॉसच्या घरात खरंच सेक्स होतो का? या प्रश्नाचं उत्तर नावेद सोलने दिलं आहे.

सिद्धार्थ कननसोबत बातचित करताना नावेदने बिग बॉसच्या घरातील गुपित उघड केलंय. कपल्समधील रोमान्सवरही त्याने प्रतिक्रिया दिलीय.

सिद्धार्थने एक फोटो दाखवला, ज्यामध्ये नावेद एका बेडवर ईशासोबत बसलाय. तर त्याच्या बाजूला असलेल्या बेडवर चादरीत हालचाल होताना दिसत आहे

सिद्धार्थ कनने नावेदला विचारलं की, युजर्स हा फोटो बघून प्रश्न विचारत आहेत की, चादरीत सेक्स होतोय का?

त्यावर नावेद म्हणाला, ही कदाचित जिगना आहे. ती आपल्या पायांना खालीवर करत आहे. ती नेहमी तसं करते. मी त्यांना स्पायसी टीका मसाला म्हणतो. हे एक प्रँक आहे बाकी काही नाही.

नावेद पुढे म्हणाला, मी इमानदारीने आणखी एक सांगू इच्छितो, रुम नंबर 1 मध्ये सातत्याने ईशा आणि समर्थ चादरीत काहीतरी करायचे. बऱ्याचदा चादरीत हालचाल बघितली गेलीय.

मी अंकिताला याबाबत बोललो होतो. चादरीत काहीतरी होतंय, माहिती नाही काय होतंय, ते कदाचित योगा करत असतील, असं नावेद हसत म्हणाला.