बिग बी अमिताभ बच्चन या शतकाचे महानायक आहे. कोट्यवधी लोकांचे आदर्श आहे.

2 March 2025

जगभरात अमिताभ बच्चन यांचे मोठो फॉलोअर्स आहेत. परंतु कोणी जात विचारल्यावर अमिताभ यांना वाईट वाटते. 

'कौन बनेगा करोड़पति 16' च्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. हॉटसीटवर कोलकाताची युबासना कापस बसल्या होत्या.

युबासना या दिल्लीत मिरांडा हाउसमध्ये सोशियोलॉजीचा अभ्यास करत आहे. यावेळी जाती व्यवस्थेचा कसा त्रास होतो, त्याची माहिती युबासना यांनी अमिताभ यांना दिली. 

युबासनाच्या 'मन की बात' ऐकून अमिताभ म्हणाले, जातीवाद एक जुनी समस्या आहे. अजूनही जातीवाद कायम आहे. ते पाहून खूप दु:ख होते. 

अमिताभ म्हणाले, जेव्हा जात जनगणनाची टीम येते ते सर्व माहितीसोबत आमची जातही विचारतात. 

अमिताभ म्हणतात, मी त्यांना सांगतो माझ्या वडिलांनी मला कधी जात सांगितली नाही. त्यामुळे मला माहीत नाही.

जात जनगणनाची टीम म्हणते, काही तरी लिहावे लागणार आहे. तेव्हा मी त्यांना सांगतो 'इंडियन' लिहा. आम्हाला जाती व्यवस्था तोडायची आहे.