शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात गेले

11 November 2023

Created By: Chetan Patil

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात आज जोरदार शक्तीप्रदर्शन केलं

ठाकरेंना विरोध करण्यासाठी शिंदे गटाचे देखील कार्यकर्ते दाखल झाले होते

त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता

पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना शाखेपासून 10 मीटर अंतरावर रोखलं

पोलिसांच्या विरोधामुळे ठाकरेंना लांबूनच शाखेची पाहणी करुन परतावं लागलं

ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय

मुंब्र्यात फुसके बार आले, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला

त्यांना युटर्न घेऊन जावं लागलं, हा आनंद दिघे यांचा जिल्हा आहे, असं शिंदेंनी ठणकावून म्हटलं