आजकाल बदलत्या जीवनशैली आणि आहार तसेच प्रदुषणाने टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे.
हेअर फॉलच्या समस्येत योगा केल्याने खूप मदत होते.अशी 5 योगासने पाहूयात ज्याने केसगळती रोखता येते.
अधोमुख श्वानासन केल्याने डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
शीर्षासन - या आसनाला आसनांचा राजा म्हटले जाते. यानेही केसांच्या मुळांकडे रक्तप्रवाह वाढतो.त्यामुळे केस मजबूत होतात. परंतू हे आसन करताना एक्सपर्टची मदत घ्यावी
भुजंगासन - या आसनाने तणाव कमी होतो. हार्मोनल संतुलन होते. तणाव कमी झाल्याने केसगळतीची समस्या दूर होते.तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी हे आसन करु शकता.
उत्तानासन - या आसनाने डोक्यापर्यंत ऑक्सीजन आणि पोषकतत्वे पोहचतात. ड्राय स्कॅल्प आणि कमजोर केसांची समस्या दूर होते. रोज केल्याने लवकर रिजल्ट मिळतो.
व्रजासन आणि प्राणायम - वज्रासनाने पचन सुधारते आणि प्राणायम तणाव कमी करतो. पचन चांगले झाल्याने केसांवर थेट प्रभाव पडतो.त्यामुळे रोज सकाळ आणि संध्याकाळी ही आसने करा.