04 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
04 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
सह्याद्री म्हटलं की इतिहास, पराक्रम आणि भन्नाट निसर्ग डोळ्यांसमोर येतो. पण यातील किल्ल्यांवर ट्रेकिंग करण्याचा विचार केला, तर शरीराची आणि मानसिक ताकदीची कसोटी लागते.
कुठे खडकात कोरलेल्या पायऱ्या, कुठे अरुंद वाटा, तर कुठे आकाशाला भिडणारे डोंगर. त्यामुळे हे किल्ले फिरण्यासाठी नाही, तर साहस आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी मोठं आव्हानच आहे.
लिंगाणा किल्ला लिंगाण्याचा सुळका दुरून शिवलिंगासारखा दिसतो. मात्र त्याची चढाई अत्यंत कठीण आहे.सरळ कातळ आणि खोल दऱ्यांमुळे हा किल्ला अनुभवी ट्रेकर्ससाठीही मोठं आव्हान ठरतो.
हरिहर किल्ला हरिहराच ओळखच त्याच्या 80 अंशाच्या कोनात खडकात कोरलेल्या पायऱ्यांमुळे आहे. दोन्ही बाजूंना खोल दऱ्या आणि हात ठेवण्यासाठी असणाऱ्या खाचा यामुळे पायऱ्या चढताना पाय थरथरल्याशिवाय राहत नाही
राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. राजगडचा परिसर प्रचंड मोठा आहे. संजीवनी, पद्मावती माची फिरताना मोठ्या प्रमाणात चढ - उतार करावे लागते. त्यामुळे राजगडाचा ट्रेक करताना प्रचंड स्टॅमिना लागतो.
तोरणा किल्ला विशाल डोंगरावर तोरणा किल्ला बसलेला आहे. तोरणा चढताना खडकाळ वाटा आणि चढण दमवून टाकते. पावसाळ्यात धुकं, वारा आणि निसरड्या वाटांमुळे ट्रेक रोमांचक होतो
प्रतापगड किल्ला जावळीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या प्रतापगडाच्या परिसरात जंगल, चढ - उतार आणि खोल दऱ्या आहेत.पावसाळ्यात निसरड्या वाटांमुळे ट्रेकिंग करताना काळजी घ्यावी लागते.