शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी असा रचला होता किल्ला; एकेक  संरक्षण यंत्रणा पाहून डोकं चक्रावेल 

10 ऑक्टोबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

शत्रूला चकवणारा भुलभुलैया देवगिरी म्हणून ओळखला जाणारा दौलताबाद किल्ला डेक्कन पठारावर 200 मी. उंच डोंगरावर आहे. हल्ला करणाऱ्या प्रत्येक शत्रूसाठी हा किल्ला म्हणजे एक मोठं आव्हानच आहे

अरुंद आणि वळणावळणाची वाट किल्ल्यावर जाण्यासाठी अरुंद, वळवळणाचा  मार्ग आहे.बदलती उंची, तीव्र वळणाची रचना  शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी करण्यात  आली होती .

भिंती उंच कड्यांमध्ये कोरलेल्या   किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती उंच कड्यांमध्ये कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे बाहेरून किल्ल्याच्या भिंती चढणं जवळपास अशक्य आहे.

खंदक आणि त्यात मगर किल्ल्याभोवती खोल खंदक होता. या खंदकात मगरी असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे किल्ल्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूसाठी हा आणखी मोठा अडथळा होता

हत्तीही दरवाजा तोडू शकणार नाही  किल्ल्याचे प्रवेशव्दार प्रचंड मोठे असून त्यावर लोखंडी काटे लावलेले होते. हे दरवाजे युद्धातील हत्तींच्या हल्ल्यातही तोंड देऊ शकतील अशा  पद्धतीने बनवण्यात आले होते.

गुप्त वाटा आणि लपलेले सापळे किल्ल्याच्या आत लपलेले दरवाजे आणि  गुप्तम मार्ग होते. अनोळखी आक्रमनांना  गोंधळात टाकून अडकवण्याासाठी या  मार्गांचा वापर केला जात असे.

किल्ल्याची ताकद  आजही जाणवते  आज दौलताबादचा किल्ला इतिहास,  स्थापत्यकला आणि साहस यांचा अनुभव देणार्‍या ठिकाणांपैकी एक आहे. माथ्यावर पोहोचल्यावर दिसणारा विस्तीर्ण डेक्कन परिसर या संपूर्ण  चढाईला वेगळाच अनुभव देतो