महाराष्ट्रातील टॉप-10 धबधबे पाहीलेत का ? यंदाचा मान्सून एन्जॉय करा

17 June 2025

Created By: Atul Kamble

काळू धबधबा, महाराष्ट्रातील माळशेज घाटाजवळील हे एक सुंदर ठिकाण आहे. हा धबधबा खिरेश्वर गावाजवळ असून हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे

आडराई धबधबा - माळशेज घाटात आडराईचं दाट जंगल आहे. कल्याणमार्गे नगरला जाणाऱ्या बसने खुबी फाट्यावर उतरावे येथून खिरेश्वर गावातून हा ट्रेक सुरू होतो. 

नाणेघाटातील उलटा धबधबा - माळशेजला जाताना जुन्नर येथे नाणेघाटात हा धबधबा आहे.वाऱ्याच्या वेगाने याचे पाणी वर उडते म्हणून त्यास उलटा धबधबा म्हणतात

टकोरी धबधबा - टकोरी धबधबा पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सांगोरे गावाजवळ आहे.पावसाळ्याच्या दिवसात हा धबधबा सुंदर दिसतो

माळशेज घाट धबधबा - माळशेज घाटात एसटी बसेस किंवा वाहनांच्या छतावर या धबधब्याच्या पाण्याचा वर्षाव अनेकांना आठवत असेल

 ठोसेघर धबधबा - सातारापासून १८ किमीवर ठोसेघर आणि चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ तारळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा आहे.

प्लस व्हॅली- ताम्हीणी घाट - येथील प्लस व्हॅली हे  नाव दरीच्या विशिष्ट आकारावरून मिळाले आहे, जे दूरवरून पाहिल्यास 'प्लस' (+) चिन्हासारखे दिसते.

झेनिथ धबधबा -   खोपोलीतील (Khopoli) झेनिथ धबधबा देखील प्रसिद्ध आहे. परंतू येथे जाताना सावधानता बाळगावी लागते.

देवकुंड धबधबा - देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात असून भिरागावातून दोन ते तीन तास येथे पोहचायला लागतात

लिंगाणा घाट धबधबा - याला लिंग्या घाट धबधबा देखील म्हणतात याला जाण्यासाठी लव्हासा रोडवरुन जावे लागते.