प्रदुषणातून सुटका मिळवायची आहे तर ही 7 हिल स्टेशन फिरुन या

23 october 2025

Created By: Atul Kamble

स्पीती व्हॅली - हिमालयात वसलेली स्पीती व्हॅलीतील हवा इतकी शुद्ध आहे की तुम्ही एकदम फ्रेश व्हाल,निळे आकाश, बर्फाने झाकलेले डोंगर तुमचा थकवा दूर करतील

औली - स्कीईंगसाठी प्रसिद्ध औली सुंदर तर आहेच शिवाय शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहे.येथील थंड हवेची झुळूक देवदारचे वृक्ष शरीर आणि मन ताजेतवाने करतात

 कुर्ग - कुर्गला भारताचे स्कॉटलँड म्हटले जाते. वृक्षराजींनी नटलेल्या या भागातील हवा इतकी स्वच्छ आहे की दिवाळीच्या प्रदुषणात बेस्ट डेस्टीनेशन आहे

जगातला सर्वात लांबचा विमान प्रवास आता न्यूयॉर्क ते फूझो ( Fuzhou) दरम्यान आहे.

माऊंट अबू - राजस्थानातील एकमेव  हिल स्टेशन स्वच्छ वातावरणासाठी ओळखले जाते. येथील पाण्याचे सरोवर आणि अरावलीची हिरवळ मनाला मोहित करते.

 मुनार - येथील दऱ्यातील चहाचे मळे आणि डोंगरातील थंड हवा मनाला मोहून टाकते.संपूर्ण वर्षभर येथे हवामान चांगले असते. 

तवांग - पूर्वोत्तर भारतातील तवांग हिवाळ्यात बर्फवृष्टीने आणखीनच मोहक होते. येथील हवा इतकी स्वच्छ आहे की तुम्ही जणू ढगात जाऊन बसलाय असे वाटेल

कनाताल - गर्दीपासून दूर असलेले कनाताल प्रदुषणापासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम आहे. हे छोटे हिल स्टेशन बेस्ट ऑप्शन आहे.